बीड, २० मार्च २०२४ : महविकास आघाडीकडून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यांचं नाव चर्चेत आहे. त्या बजरंग सोनवणे यांनी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
xbox 360 freezing scaffalatura cantilever Italy amazon goldkette 24 karat herren ASU Jerseys selected frakke brun adidas solar boost sizing sweep belted tires миглопластика косъм по косъм hypervenom nike acc věšák na klíče domeček adidas compensée amazon die beste wasserpistole der welt adidas solar boost sizing t shirt gr 98 fsu jersey
गेल्या अनेक दिवसांपासून बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे म्हणजेच मविआचे उमेदवार असू शकतात. असा तर्क-वितर्क लावला जात होता आणि अखेर आज त्यांनी राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे..
दरम्यान बजरंग सोनवणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. जिल्हा परिषदचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. यासह कारखानदारीमध्ये देखील त्यांचं नाव आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिलेल्या, बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : बीड
.jpeg?updatedAt=1710923538190)