गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे बाणेर येथे पॅनकार्ड क्लबला आग

बाणेर येथे पॅनकार्ड क्लबला आग

पुणे : बाणेर येथील पॅनकार्ड क्लबला सकाळी ११.३० ते १२ च्या सुमारास आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. अचानक लागलेल्या या आगीत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही. अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाले आहे.

याबाबत प्रत्यक्ष दर्शीने दिलेल्या माहितीनुसार, पॅनकार्ड क्लब येथे कामकाज सुरू असताना अचानक आग लागली.त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकाच धांदल उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचरण्यात करण्यात आले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ही आग बघण्यासाठी बाणेर परिसरातील नागरिकांची एकाच गर्दी झाली होती.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version