गोल पोस्ट इतर राजकारण पडळकरांना जोडे मारा, एक लाखांचे बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीची ऑफर

पडळकरांना जोडे मारा, एक लाखांचे बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीची ऑफर

नागपूर, २० सप्टेंबर २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दादा गट आक्रमक झाला आहे. आमदार पडळकरला जोडे मारा, एक लाखांचे बक्षीस मिळवा अशी अफलातून ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज दिली आहे. पडळकर मंगळसूत्र चोर असून, त्यांना जोडे मारणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.

पडळकर यांना राज्यात कोणीही जोडे मारले, कपडे फाडले, भर चौकात मारल्यास नागपूर कार्यालयातून एक लाखांचे बक्षीस देऊ असेही पवार यांनी सांगितले. धनगर समाजासाठी आरक्षणाचा देखावा, भाजपचे लक्ष वेधून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याची त्यांची उंची, लायकी नाही. हे डुकराचे पिल्लू नागपूरला येईल तेव्हा त्याला सोडणार नाही.

पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर येथून माहिती काढणार आहोत अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडळकरांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. युवक काँग्रेसने आज जोडे मारले आहेत लवकरच आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळू असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version