गोल पोस्ट राजकारण सत्तेवाचून आयुष्य “बेचव”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सत्तेवाचून आयुष्य “बेचव”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २७ जुलै २०२०: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दौरे करत असून त्यांनी आघाडी सरकाराला धारेवर धरत अनेक वेळा निशाणे साधले. यावर माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी मौन सोडतील याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खुमासदार शैलीत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

कोरोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे चव जाणे राज्यात जेंव्हापासून सत्ता परिवर्तन झाले तेंव्हापासून अनेकांचे आयुष्य हे बेचव झालेले असू शकते असे उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत, एका संस्थेने देेशभरातूम सर्वौत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली हे देखील त्यांच्या पोटात दुखत असेल असे त्यांनी टोला लगावला.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हि फारशी बरी नसली तरी आघाडी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. तर विरोधी पक्षातील नेते हि सरकार बरोबर मिळून काम करण्यापेक्षा त्यांच्यावर वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून टिका करत असतात. मात्र राज्य सरकारचे अनेक मंत्री देखील अशा टिकेला वेळोवेळी प्रतिउत्तर देत असतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version