गोल पोस्ट महाराष्ट्र भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भोकरदनमध्ये उत्साहात साजरी

भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भोकरदनमध्ये उत्साहात साजरी

भोकरदन, जालना २६ डिसेंबर २०२३ : भारतरत्न श्रध्देय स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भाजपा कार्यालय भोकरदन येथे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी आ.संतोष पाटील दानवे यांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी बोलतांना आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, श्रध्देय अटल बिहारी वाजयपेयी हे एक कुशल राजकारणी, एक मितभाषी नेतृत्व, कवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व होते. भारतीय जनता पक्षाला देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान प्राप्त करुन देण्यात त्यांचे अद्वितीय योगदान आहे. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले, मुकेश चिने, पं.स.सभापती विनोद पा.गावंडे, भाजयुमो शहराध्यक्ष दिपक पा.जाधव, राजेश जोशी, नगरसेवक सुरेश शर्मा, गजानन तांदुळजे, विजय मतकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

error: Content is protected !!
Exit mobile version