गोल पोस्ट इतर भारताचे पहिले आयसीएस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर

भारताचे पहिले आयसीएस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर

भारतीय नागरी सेवेत निवडून गेलेले पहिले भारतीय म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर. त्यांनी ब्रिटीश राजवटीतही भारतीयांची पदावर नेमणूक करण्याचे काम केले होते. आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी.

सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म १ जून १८४२ मध्ये कोलकाता येथे झाला. १८३२ मध्ये मुन्सिफ आणि सदर अमीन यांची पदे भारतीयांसाठी तयार करून या पदावर भारतीयांची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी ब्रिटीश कालीन राज्यात फक्त ब्रिटिशांची निवड होत होती. मात्र १८३३ मध्ये, उप-दंडाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पदावरही भारतीयांना निवडण्याची परवानगी देण्यात आली.

टागोर यांनी भारतीय सिव्हिल सर्व्हिसची स्थापना भारतीय नागरी सेवा कायदा १८६१ अंतर्गत करण्यात आली. सत्येंद्रनाथ जून १८६३ मध्ये प्रथमच निवडून आले. त्यानंतर ते प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. नोव्हेंबर १८६४ मध्ये ते परत आले. सत्येंद्रनाथ यांनी १८६५ मध्ये सहाय्यक दंडाधिकारी व अहमदाबादचे जिल्हाधिकारी या पदावर काम सुरू केले ते सुमारे ३० वर्षे नागरी सेवेत राहिले. त्या दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना कर वसूली करण्याचे मुख्य काम पहोते. १८९६ मध्ये ते महाराष्ट्रातील सातारा येथे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. सत्येंद्रनाथ हे एक प्रसिद्ध लेखक, बहुभाषा जाणकार, गीतकार होते. ते महान कवी रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू होते.
सत्येंद्रनाथ टागोर यांनी बौद्धधर्म (१९०१) मध्ये हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण काम केले. बोम्बाई चित्र (१८८८), आत्मचरित्र :आमार बाल्यकथा ओ बोम्बाई प्रवास (१९१५). याशिवाय नाटके : सुशीला, वीरसिंह. कालिदास यांच्या मेघदूताचा बंगाली अनुवाद व नवरत्नमाला, स्त्री स्वाधीनता आदी ग्रंथ उल्लेखनीय आहे.
सत्येंद्रनाथ मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते. त्यांनी लो. टिळकांच्या गीता रहस्याचा बंगालीत अनुवादही केला. सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्रीमुक्ती-आंदोलनास हातभार लावला.
ज्ञानदानंदिनी देवींनी कुटुंबातील पडदापद्धती झुगारत रूढीविरुद्ध बंड पुकारले होते. राजभवनात व्हाईसरॉयकडून सत्कार होणाऱ्‍या त्या पहिल्या भारतीय महिला होत. त्यावेळी बंगालमध्ये राष्ट्रीय गीत म्हणून गाजलेले ‘मिले राबे भारत संतान’ हे गीत सत्येंद्रनाथांनी लिहिले होते.
९ जानेवारी १९२३ ला कोलकाता येथेच त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.

error: Content is protected !!
Exit mobile version