गोल पोस्ट महाराष्ट्र भगवान प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सभा मंडपाचे भूमिपूजन

भगवान प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सभा मंडपाचे भूमिपूजन

नांदगाव, २३ फेब्रुवारी २०२४ : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे काल भगवान प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून न्यायडोंगरी येथे सभामंडप मंजूर करण्यात आला. या जयंतीचे औचित्य साधून काल या सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन विलास आहेर, किरण कांदे, विश्वकर्मीय वंशीय सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष लोहार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विश्वकर्मीय सुतार लोहार समाज बांधवांनी आलेल्या पाहुण्यांचा पुष्पहार देत सत्कार केला.

याप्रसंगी माजी सरपंच नरेंद्र आहेर, संजय दिनकर आहेर, विजुभाऊ आहेर, धनंजय आहेर, गणेश आहेर, दादा आहेर, राजाभाऊ तळवणे, अनिल तुळशीराम आहेर, तसेच युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, भाऊराव बागुल, प्रकाश शिंदे, बाजार समितीचे संचालक दीपक मोरे शशिकांत सोनवणे रमेश काकळीज, आण्णा मुंडे, उमेश मोरे, बापू जाधव, आदींसह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सोनाली आढाव यांनी केले. तर जालम आहेर व शैलेश मिस्त्री यांनी आभार प्रदर्शन केले.

न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version