गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे भोर-मुळशी-राजगड मतदारसंघातील विकासकामांसाठी वन विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

भोर-मुळशी-राजगड मतदारसंघातील विकासकामांसाठी वन विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे वेगाने पूर्ण व्हावीत आणि वन विभागातील अडचणींमुळे प्रलंबित असलेली सुमारे ५५ ते ६० गावांमधील कामे मार्गी लागू शकावीत, या उद्देशाने पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक मा. महादेव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर येथे विशेष बैठक पार पडली.

या बैठकीत राजगड, रायरेश्वर, बनेश्वर, मढे घाट रस्ता, घोल-कुंबे रस्ता, देवघर आदी गावांमधील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामविकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राजगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, माजी सदस्य चंद्रकांत बाठे, तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम खुटवड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भोर सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, भोर वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, राजगड (वेल्हे) वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, नसरापूर वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, पौड वन परिमंडळ अधिकारी नंदकुमार शेलार यांच्यासह मतदारसंघातील विविध गावचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version