गोल पोस्ट महाराष्ट्र राजकीय स्वार्थापोटी ओबीसी आणि मराठ्यांत वादविवाद होण्याची भुजबळांची इच्छा- मनोज जरांगे

राजकीय स्वार्थापोटी ओबीसी आणि मराठ्यांत वादविवाद होण्याची भुजबळांची इच्छा- मनोज जरांगे

जालना ६ जानेवारी २०२४ : श्री विठ्ठलानं छगन भुजबळांना सद्बुद्धी देवो असा खोचक टोला जरांगे पाटलांनी भुजबळांना लगावलाय. जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातल्या गोदाकाठच्या १२३ गावांच्या दौर्यावर आहेत.या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आज पंढरपुरात ओबीसींची सभा होत असून भुजबळांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलंय. मात्र विठ्ठलान भुजबळांना सद्बुद्धी द्यावी, कारण त्यांची ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वादविवाद करण्याची इच्छा आहे. मात्र त्यांची इच्छा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही.

भुजबळांनी आता बोलू नये आणि सल्लेही देवू नये. त्याने रस्त्यावर लढू नाही तर डांबरावर झोपू आम्ही ओबीसी आहोत आणि ओबीसीतूच आरक्षण घेणार असा टोलाही जरांगे यांनी लगावलाय. त्याचबरोबर आमची मुंबईला जाण्याची तयारी सुरु असून गोदाकाठच्या लाखो महिला या मराठा बांधवांना वाटंला लावायला येणार आहेत. परवानगी मिळाली नाही तरी आम्ही मराठे मुंबईला जाणार आणि तिथे मांडी घालून बसणार. त्यामुळं सरकारनं शहानपणाची भूमिका घेवून तोडगा काढावा असा इशारा जरांगे पाटलांनी पुन्हा राज्य सरकारला दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version