गोल पोस्ट इतर राजकारण साताऱ्यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का ; जिल्हाध्यक्ष प्रताप जाधवांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत...

साताऱ्यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का ; जिल्हाध्यक्ष प्रताप जाधवांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश!

सातारा, १२ जानेवारी २०२३ : सातारा जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी काल मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार महेश शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ आदी उपस्थित होते.

खटाव तालुक्यामध्ये अगदी शिवसैनिक या पदापासून शिवसेनेमध्ये निष्ठेने काम करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून प्रतापराव जाधव यांचे नाव सातारा जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो प्रश्नांना प्रतापराव जाधव यांनी निश्चितपणे न्याय दिला आहे.

मूठभर सोंगाड्यांना बरोबर घेऊन जनतेच्या प्रश्नांची सतत आक्रमक असणाऱ्या प्रताप जाधव यांना शिवसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी विविध पदावरती काम करण्याची संधी मिळाली. पुसेगाव शहर प्रमुख, खटाव तालुका प्रमुख, जिल्हा उपप्रमुख आणि काही महिन्यांपूर्वीच मिळालेले सातारा जिल्हा प्रमुख या माध्यमातून शिवसेनेमध्ये त्यांच्या नेतृत्व निश्चितपणे आकाराला आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version