गोल पोस्ट इतर राजकारण आमदार राम शिंदेना घरचा आहेर, भाजप नगरसेवकाची थेट बावनकुळेंकडे तक्रार

आमदार राम शिंदेना घरचा आहेर, भाजप नगरसेवकाची थेट बावनकुळेंकडे तक्रार

कर्जत, नगर ६ ऑगस्ट २०२३ : कर्जत नगरपंचायतच्या भाजप नगरसेविका मोहिनी पिसाळ यांचे पती दत्तात्रय पिसाळ यांनी आमदार राम शिंदे हे भाजपच्या नगरसेविकांना निधी देत नसल्याची तक्रार, थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यांनी स्वतः फोन करून त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे. या संदर्भात दत्तात्रय पिसाळ हे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला गेले असता, त्यांची ही भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, आमदार राम शिंदे हे नगरपंचायतीला कुठलाही निधी मिळू देत नाहीत. मी एकटा भाजपचा नगरसेवक असूनही कुठलेही काम माझ्या प्रभागात झाले नाही आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काही दिवसांपूर्वी मुंबईला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला गेलो असता, त्यांनीही कसलाच प्रतिसाद दिला नाही.

सध्या एमआयडीच्या मुद्यावरुन कर्जत-जामखेडच्या राजकारणाची चर्चा होत असताना भाजपच्याच नगरसेवकांनी आमदार राम शिंदेना घरचा आहेर दिल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version