गोल पोस्ट इतर राजकारण विधानपरिषदेसाठी भाजपने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांना डावलले

विधानपरिषदेसाठी भाजपने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांना डावलले

मुंबई, दि.४ मे २०२० : विधान परिषदेची निवडणूक तोंडावर असताना भाजपकडून अनेक दिग्गज रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रकांत बावनकुळे यांची नावे भाजपकडून आघाडीवर आहेत. मात्र, भाजपकडून या तीनही महत्वाच्या नेत्यांना धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेची उमेदवारी देतांना भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी कोणतीही दखल घेतली नाही.

महराष्ट्रातुन भाजपने प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे व रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे अथवा एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतांना अचानक नवीन उमेदवारांची नावे समोर आल्याने या प्रमुख नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे आता मुंडे आणि खडसे गट कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version