झोपडपट्टीवासीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी भाजप आमदाराचे ठिया आंदोलन

नाशिक, दि.२२ मे २०२०: नाशिकच्या गंजमाळ येथील झोपडपट्टीला २४ एप्रिलला भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ११६ गोरगरिबांची घरे जळून खाक झाली होती. मात्र प्रशासनाकडून अद्यापही या लोकांना आर्थिक मदत न मिळाल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी या लोकांसोबत ठिया आंदोलन केले.

वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही कुठलीही मदत मिळालेली नसल्याने भाजपाच्या विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी बि डी भालेकर मैदान येथे काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत आहेत.

सध्या या पीडित रहिवाशांना नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये निर्वासितांसारखे जीवन जगावे लागत आहे. शासनाने या परिवारांना एक लाख रुपये प्रती परिवार मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मागणी सरकार कडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार करूनही अद्याप निधी देण्यात आलेला नाही.

आमची घरे मिळालीच पाहिजे , एक महिना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आशा विविध प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सदर आंदोलन करण्यात आले.

आमदार देवयानी फरांदे यांच्यासह किशोर वारे , दीपक डोके , जयेश माली , मनीष जयकर , आनंद साळवे , सचिन गायकावड आधी सह भामवाडितील रहिवाशी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा