गोल पोस्ट महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भोकरदन मध्ये भाजपची आढावा बैठक संपन्न

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भोकरदन मध्ये भाजपची आढावा बैठक संपन्न

जालना २ एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने भोकरदन मध्ये भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक संपन्न झालीय. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडलीय.

जालना जिल्ह्याचे विद्यमान खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपा ने सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीय. सलग ५ टर्म पासुन दानवे जिल्ह्याचे खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा षटकार मारण्यासाठी दानवे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासूनच दानवे जोमाने कामाला लागले असून ते गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतायत. आज दानवे यांनी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीस भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version