गोल पोस्ट महाराष्ट्र कराडमधील ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी

कराडमधील ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी

कराड, ११ सप्टेंबर २०२३: पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण इंटरनेट सेवा बंद केली तसेच जागोजागी नाकाबंदी करून पुसेसावळीकडे जाणारी सर्व वाहने रोखली जात आहेत.

कराड जवळील ओगलेवाडी येथे करवडी फाट्यावर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिगेट लावून नाकाबंदी केली. पोलीस बंदोबस्त वाढवला असून, कराडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत. कोणतेही वाहन पुसेसावळीकडे सोडली जात नाहीत. सर्व वाहनांची पोलीस कसून तपासणी करत असून नाकाबंदीच्या ठिकाणीच वाहने परत पाठवली जात आहेत. आता सध्या परिसरात पोलीसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version