गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय सोमालियातील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबार, ९ ठार, ४७ जखमी

सोमालियातील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबार, ९ ठार, ४७ जखमी

सोमालिया, २४ ऑक्टोंबर २०२२: सोमालियातील किसमायो शहरातील एका हॉटेलमध्ये कार बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आलीय. ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

वृत्तसंस्थेनुसार, रविवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) रात्री उशिरा हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये स्फोट करून गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये हॉटेलमध्ये आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना लक्ष्य करण्यात आलं.

माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि सर्व हल्लेखोरांना ठार केलं. मिळालेल्या माहितीनुसार, अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या वर्षी ऑगस्टमध्येही या दहशतवादी संघटनेने सोमालियातील मोगादिशू येथील हॉटेल हयातवर हल्ला केला होता. ज्यामध्ये अर्धा डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version