गोल पोस्ट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घरफोडीतील मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घरफोडीतील मुद्देमाल जप्त

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर २३ एप्रिल २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात सोयगाव पोलिसांना यश आलंय. सोयगाव तालुक्यातील कंकराळा आणि आमखेडा येथील घरफोडीप्रकरणी अटक केलेल्या प्रवीण सुभाष पाटील (वय ३५, रा. बिलवाडी, ता. जळगाव) याच्या ताब्यातून शनिवारी सायंकाळी ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

१४ एप्रिल रोजी दुपारी कंकराळा, आमखेडा येथील तीन घरे फोडून आरोपीने १० लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सोयगावचे पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीला बुधवारी जळगावातून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.आरोपिकडून अजिंठा, फर्दापूर येथेही त्याने घरफोड्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असून, कंकराळा येथील घरफोडीतील ७ लाख ८० हजारांपैकी ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्याकडून शनिवारी जप्त केलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी

error: Content is protected !!
Exit mobile version