गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे लग्नात वाजवलेल्या फटाक्यांमुळे गाड्यांचा स्फोट

लग्नात वाजवलेल्या फटाक्यांमुळे गाड्यांचा स्फोट

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे एका लग्नसमारंभात भीषण आग लागण्याची घटना समोर आली आहे. हा लग्नसमारंभ पार पडल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडण्यात आल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळशी तालुुक्यातील चाले दखने रोडवरील सुभद्रा मंगल कार्यालयातील ही घटना आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या या आगीत एक स्कॉर्पिओ, एक बलेनो आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
यातील धक्कादायक बाब म्हणजे बलोनो गाडीत एक चिमुकली झोपलेली होती, मात्र तिला वेळेत गाडीतून बाहेर काढण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला.
गाड्यांना आग लागल्याने वऱ्हाडी मंडळींमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता.
त्यामुळे लग्नसमारंभात फटाके फोडताना काळजी घ्यायला हवी हे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version