गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे प्रवासादरम्यान महिलेशी अश्लिल वर्तन करणारा बसचालक पोलिसांच्या ताब्यात, बंडगार्डन पोलिसांची कारवाई

प्रवासादरम्यान महिलेशी अश्लिल वर्तन करणारा बसचालक पोलिसांच्या ताब्यात, बंडगार्डन पोलिसांची कारवाई

पुणे, २५ सप्टेंबर २०२२ : तेलंगणा येथून हैद्राबाद ते पुणे स्लिपर कोच बस मधून प्रवास करताना प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन करणार्‍या बसचालकाला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही हैदराबाद नामपल्ली ते पुणे स्टेशन या दरम्यान प्रवासात घडली. शेख अस्लम शेख अलिमउद्दीन वय २७, रा. शरीफनगर, हैद्राबाद, तेलंगणा असे ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे.

पुण्यामध्ये पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस स्टेशनला याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पीडित महिला या शहा टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकीच्या नामपल्ली हैद्राबाद ते पुणे स्टेशन या स्लिपर कोच बसणे प्रवास करत होत्या.

यावेळी प्रवासादरम्यान बसचालकाने त्यांच्याजवळ जाऊन. त्यांचे डोके दाबून देण्याचा बहाणा करत, फिर्यादीच्या जवळ जाऊन झोपला. त्यांना जबरदस्तीने कुशीत घेऊन त्यांच्या मानेच्या मागील बाजूस चुंबन करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version