गोल पोस्ट महाराष्ट्र तारखेला गैरहजर राहणाऱ्या दोघांवर जालन्याच्या गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा

तारखेला गैरहजर राहणाऱ्या दोघांवर जालन्याच्या गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा

जालना १३ जुलै २०२४ : न्यायालयाच्या आदेशाने जामीन मिळाल्यानंतर तारखेला गैरहजर राहणाऱ्या दोघांविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दादासाहेब मधुकर खरात (वय ३८, डोमलगाव, ता. अंबड) व राहूल बंडू केसरे (वय २५, रा. शहागड, ता. अंबड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

अंबड येथील प्रथमवर्ग न्यायालयात राहुल व दादासाहेब यांच्या विरुध्द एका खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, संशयितांना तारखेला न्यायालयात हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, वारंवार तारीख वाढवून दिल्यानंतरही दोघे न्यायालयात हजर राहिले नाही. याबाबत काढलेल्या वारंटही स्वीकारले नाही. त्यानंतर संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

त्यांना पकडून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांची रवानगी कारागृहात केल्याची माहिती गोंदी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलीय.

न्यूज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version