गोल पोस्ट गुन्हा महिलांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्यांवर छत्रपती जन्मोत्सव समितीकडून कारवाईची मागणी

महिलांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्यांवर छत्रपती जन्मोत्सव समितीकडून कारवाईची मागणी

पिंपरी चिंचवड, दि. १८ जून २०२० : पिंपरी चिंचवड येथे tik tok व्हिडिओ तयार करून मराठा समाज व मराठा समाजाच्या माता भगिनींवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या समाजकांटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने आज करण्यात आली आहे.

बारामती शहरातील छत्रपती जन्मोत्सव समितीने आज बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पिंपरी चिंचवड येथे मराठा समाज व मराठा समाजाच्या महिलांवर अश्लील टिप्पणी करून बदनामी करण्याच्या उद्देशाने ते व्हिडीओ प्रसार माध्यमावर प्रसारित करण्यात आले आहेत.

यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो तरी अशा प्रकारचे सर्व व्हिडीओ प्रसार माध्यमांवरून काढून टाकण्यात यावेत तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन आज छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version