गोल पोस्ट Breaking News गोरक्षकावर हल्ला करणारा मुख्य आरोपी मुंबईतून अटकेत

गोरक्षकावर हल्ला करणारा मुख्य आरोपी मुंबईतून अटकेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोमांस प्रकरणावरून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोरक्षक गणेश शेळकेवर हल्ला करणारा मुख्य आरोपी परवेज मुसा कुरेशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईतील कुर्ला भागातून त्याला अटक करण्यात आली. घटनेत २० ते २५ जणांच्या टोळक्यानं चाकू व कोयत्याने गणेश शेळकेवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर परवेज कुरेशी फरार झाला होता. पोलिसांनी वेगवान तपास करत तिघांना यापूर्वीच अटक केली होती. मात्र मुख्य सूत्रधार परवेज मुंबईत लपल्याची माहिती मिळताच त्याचा शोध घेत अटक केली आहे.शेळके हे गोरक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक वेळा गोमांस वाहतूक करताना पकडलेल्या आरोपींवर कारवाई केली होती. त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: संजय आहेर

error: Content is protected !!
Exit mobile version