गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे सरन्यायाधीशांवर हल्ला – पुण्यात वकिलांचे आंदोलन

सरन्यायाधीशांवर हल्ला – पुण्यात वकिलांचे आंदोलन

भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने पुणे जिल्हा न्यायालयात निदर्शन आणि आंदोलन आयोजित करण्यात आले. ॲड. किरण कदम यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात ॲड. राहुल ढाले, ॲड. सुमेध घनवट, ॲड. अजय डोळस, ॲड. प्रियंका खंडाळे, ॲड. शारदा वाडेकर, ॲड. अंबादास बनसोडे, ॲड. एकनाथ जावीर, ॲड. राणी कांबळे, ॲड. एकनाथ सुगावकर, ॲड. सुचित मुंदडा, ॲड. जगदीश सोनवणे, ॲड. मनीष मगर, ॲड. अतुल सोनवणे, ॲड. संतोष जाधव, ॲड. संघमित्रा गायकवाड, ॲड. फारिया टीनवाला, ॲड. अनिल नगराळे, ॲड. किरन सुरवाडे, ॲड. रमन घोरपडे, ॲड. विशाल सोनवने, ॲड. यशवंत गायकवाड, ॲड. प्रियंका गायकवाड, ॲड. जावळे, ॲड. रणखंबे, ॲड. सूरज कांबळे, ॲड. विजयसिंह निकम, ॲड. विश्वजीत पाटिल, ॲड. त्रिभुवन, ॲड. शाक्य, ॲड. भड़कवाड़, ॲड. श्रुती संपकाळ, ॲड. त्रिरत्ना बागुल, ॲड. राज जाधव यांसह मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले.

सभेत सर्व वकिलांनी एकमताने मागणी केली की, “हल्लेखोर राकेश किशोर तिवारी याने केलेला हल्ला फक्त एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय न्यायसंस्थेवर आणि संविधानावर केलेला हल्ला आहे. माध्यमांनी हल्लेखोराचे उदात्तीकरण करू नये. हल्लेखोराने शांत डोक्याने हा हल्ला केला असून, त्यामागील अदृश्य शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान तसेच इतर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.”

यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. महेंद्र महाजन साहेबांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. महाजन साहेबांनी त्वरित सदर निवेदन मा. उच्च न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version