गोल पोस्ट इतर राजकारण पोलिसांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

पोलिसांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबई, ३० जूलै २०२२: राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस २४ तास झटत असतात. त्यामुळे पोलिसांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी घरे निर्माण करणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मालेगावातील पोलीस वसाहतीच उद्धघाटन पार पडलं. या निमित्त कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना घरच टेन्शन असू नये हा प्रयत्न राहील. त्या प्रमाणेच आता राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी घरे निर्माण करणार आहेत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान त्याच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबईतही एक बैठक नुकतीच पार पडल्याची त्यांनी माहिती दिली. यात मुंबईत ५० हजार पोलीसांच्या तुलनेत केवळ १९ हजार घरेचं उपलब्ध आसल्याचे माहिती दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवासी घरे तयार करायच्या आहेत अछि जुन्या वसाहती दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मत नोंदवले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version