गोल पोस्ट क्रीडा चित्रपटात काम करणारा दिग्विजय आता आयपीएलमध्ये

चित्रपटात काम करणारा दिग्विजय आता आयपीएलमध्ये

नवी दिल्ली: आयपीएलच्या आगामी हंगामासाठीची लिलावप्रक्रिया नुकतीच पार पडली. यात अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली लागल्याने त्यांची चांदी झाली आहे.
यात विराट सिंह, यशस्वी जयस्वाल, मोहसीन खान, प्रिया गर्ग यांसारख्या युवा खेळाडूंवर जास्त बोली लागली. मात्र चर्चा झाली ती दिग्विजय देशमुख या नाव दिग्विजय देशमुखला मुंबई इंडियन्स संघानं लिलावाच्या अखेरच्या फेरीत २० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतले. क्रिकेटमध्ये करिअर करण्यापूर्वी त्याने चित्रपटांमध्ये भूमिका केली होती.
सुशांत सिंग राजपूतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काय पो चे’ या सिनेमात दिग्विजय अली हाशमीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात दिग्विजयने एका प्रतिभावान तरूण क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती.
२१ वर्षीय दिग्विजय उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम वेगवान आहे. त्यानं आतापर्यंत १ प्रथम श्रेणी आणि ७ टी -२० सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं एका सामन्यात ८५ धावा आणि ६ विकेट घेतले आहेत. त्याचबरोबर, ७ टी -२९ सामन्यात १९धावा केल्या आहेत. तर, ९ विकेटही घेतल्या आहेत. दरम्यान, दिग्विजय देशमुख महाराष्ट्रात रणजी करंडक स्पर्धेत खेळला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version