गोल पोस्ट गुन्हा पुण्यातील येरवडा कारागृहात कैधांच्या दोन गटांत तुफान हाणामारी; एक हवालदार गंभीर जखमी,

पुण्यातील येरवडा कारागृहात कैधांच्या दोन गटांत तुफान हाणामारी; एक हवालदार गंभीर जखमी,

पुणे,९ नोव्हेंबर२०२२: पुण्यातील येरवडा कारागृहात कैधांच्या दोन गटांत तुफान दगडफेक झाली आहे. जुने कैदी आणि नवीन कैदांमध्ये ही जबरदस्त दगडफेक झाली. हा सर्व प्रकार चालू असताना, कैद्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदारांलाही कैद्यांनी मारहाण केली आहे.

या मारहाणीत हवालदार हनूमंत मोरे हे गंभीर जखमी झाले असून, मिळाल्या माहितीनुसार येरावडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट सात जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिकजवळ कैधांचे दोन गट समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात बचाबाची झाली. आणि त्यांच रुपांतर मारहाणीत झाल.

हा प्रकार सूरु असताना अचानक दगडफेक सुरु झाली. पोलीस हवालदार हनूमंत मोरे यांनी कैधांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही कैधांनी मारहाण केली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कारागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version