मंगळवेढा, १९ मार्च २०२४ : सोलापूर लोकसभेसाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जवळपास निश्चित झाली असून महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते यांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवेढ्यात आज सायंकाळी ६ वाजता जुन्या पोलीस स्टेशन समोर मारुती पटांगण येथे मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली आहे.
best jordans telecomando came g117 498f fw accessoire cheveux annees 30 chez amazon grzebień do otwierania zamków stetson straw cowboy hats κρεβατια μονα με αποθηκευτικο χωρο και στρωμα detská zdravotná obuv eiszapfen lichterkette 3m rosenthal landscape horny toad clothing adidas superstar ii femme écharpe en tricot pour bébé lyngdorf mp 50 hdmi upgrade cheap yeezy shoes amazon die beste wasserpistole der welt
यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य प्रणिती शिंदे, प्रकाश यलगुलवार हे या बैठकीला उपस्थित असणार आहे. तसेच मंगळवेढा शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याला मंगळवेढा शहर तालुक्यातील महिला व काँग्रेस कमिटीचे सर्व सेलचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत साळे यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे
