गोल पोस्ट इतर राजकारण काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यात बळकट करण्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीला सहकार्य ...

काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यात बळकट करण्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीला सहकार्य – माजी मंत्री रमेश बागवे.

इंदापूर, दि.१९ ऑगस्ट २०२०: मंगळवारी पुणे, सोलापूर दौऱ्यावर असताना राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी इंदापूर काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट दिली. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही सदिच्छा भेट घेण्यात आली.

यावेळी शहरातील वाढत्या कोरोना प्रमाणावर सविस्तर चर्चा झाली. तसेच हे सरकार महाविकास आघाडीचे असल्याने इंदापुरात काँग्रेस पक्ष वाढीसाठी सहकार्य राहील असे मत रमेश बागवे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी शहराध्यक्ष तानाजीराव भोंग, इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे सचिव सुफीयान जमादार, संतोष अरडे व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी हे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.

error: Content is protected !!
Exit mobile version