गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे विभागात १३६३ रुग्ण कोरोना बाधित : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात १३६३ रुग्ण कोरोना बाधित : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.२६ एप्रिल २०२०: विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ हजार ३६३ झाली असून विभागात २१३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण १ हजार ६६ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४६ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात १ हजार ३६३ बाधित रुग्ण असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात १ हजार २३० बाधीत रुग्ण असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ३३ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ६१ बाधीत रुग्ण असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २९ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण १४ हजार ८३८ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १३ हजार ९७५ चा अहवाल प्राप्त झाला आहे. ८०६ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १३ हजार ६१४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ३६३ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ५२ लाख ७९ हजार १२४ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १ कोटी ९८ लाख ८० हजार ४१व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी १ हजार १०१ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रशांत श्रीमंदिलकर

error: Content is protected !!
Exit mobile version