गोल पोस्ट इतर मणिरत्नम यांना कोरोना

मणिरत्नम यांना कोरोना

चेन्नई, १९ जुलै २०२२: रोजा, बाँम्बे अशा चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मणिरत्नम सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय–बच्चन हिच्याबरोबर पोनियान सेल्वन या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यांची पत्नी सुहासिनी यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

८ जुलै रोजी मणिरत्नम यांनी पोनियान सेल्वन या चित्रपटाचा टीझर लाँन्च केला होता. त्यावेळी ते मिडीयासमोर आले होते. मणिरत्नम यांचे ड्रीम प्रोजेक्ट “पोनियान सेल्वन” ३० सप्टेंबरला अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चोल साम्राज्यावर आधारित या चित्रपटाला ए.आर.रेहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे संगीत आणि टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

मणिरत्नम सध्या चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात असून अजून त्यांच्या तब्येतीबाबत कोणतीही माहिती देण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. पण लवकरच याबाबतची माहिती माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

error: Content is protected !!
Exit mobile version