गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे इनोव्हेशन कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान

इनोव्हेशन कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान

पुणे, २८ ऑक्टोबर २०२० :इनोव्हेशन कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त असंघटित कामगार काँग्रेस, राहुल गांधी विचार मंच वतीने कोरोना काळात लोकांना अत्यावश्यक सेवा पुरवलेल्या डॉक्टर, पोलीस, पुणे मनपाचे कर्मचारी आदीचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन या वेळी कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला .

राहुल गांधी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी कोची, माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, राहुल गांधी विचार मंचाचे समन्वय दिपालीताई मिसाळ, महाराष्ट्र सरचिटणीस अभयजी छाजेड, नगरसेवक वैशालीताई मराठे, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिव मंत्री, राहुल गांधी महाराष्ट्र अध्यक्ष गौर साहेब, असंघटित कामगार पुणे शहर अध्यक्ष पळसे साहेब, रमेश व्यास (सचिव असंघटित कामगार काँग्रेस), निलेश वाघमारे, दिपाली शिदे, आशीष कचे, विश्वास खवळे, इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन असंघटित कंत्राटी कामगार काँग्रेस समन्वय व राहुल गांधी विचार मंच शहर अध्यक्ष किशोर मारणे, उद्योग जग किरण मारणे, प्रीती मारणे, इत्यादींनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version