गोल पोस्ट आरोग्य खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा घरामधे कोरोनाचा...

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा घरामधे कोरोनाचा शिरकाव……

कोरोनाने राजकिय वर्तुळात आपला धुमाकुळ सुरु ठेवला असून, यामुळे अनेक राजकारणीं नेत्यांना या विषाणुची लागण झाली आहे. तर या कोरोना विषाणुने नेते मंडळीच्या घरातही शिरकाव करायला सुरूवात केली आहे. ज्यामुळे नेत्यांबरोबरच त्यांच्या घरातील लोकांना देखील याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

नेहमीच आपल्या कार्यशैलीने आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहण्या-या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या घरामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या कुंटूबातील १० जणांचा कोरोना अवहाल हा पाॅजिटिव्ह आला आहे. ज्यामधे त्यांचा मुलगा ,मुलगी ज्यांचे वय ४ व ५ वर्षे आहे. तर सासू सास-यांचा कोरोना रिपोर्ट हा पाॅजिटिव्ह आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्वत:ला क्वारंन्टाईन करुन घेतले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version