एकेकाळी घरोघरी जाऊन जमा होणाऱ्या वर्गणीतून साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता पूर्णपणे कॉर्पोरेटच्या रंगात रंगला आहे! 🪔✨
शे-सव्वाशे वर्षांची वर्गणी मागण्याची परंपरा आता जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, आणि यामुळे लोकसहभागाचा आत्माच हरवतोय, अशी कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे!
पूर्वीचे चित्र वेगळंच होतं — तरुण कार्यकर्ते हातात पावती पुस्तक घेऊन महिनाभर घरोघरी फिरायचे, लोकांशी बोलायचे, संवाद साधायचे, नातं घट्ट करायचे. पण आता काही मोजके ‘उदार आश्रयदाते’ एकाच झटक्यात लाखोंची देणगी देतात. बदल्यात मोठाले फ्लेक्स, व्यवसायाची जाहिरात आणि मंडळातील पदाधिकारीपद हे हमखास मिळतं. 🏢💸
या बदलामुळे ‘वर्गणी संस्कृती’ मागे पडली, आणि ‘देणगीदार संस्कृती’ पुढे आली आहे! 🎭
परिणामी, देखावे, रोषणाई, मिरवणुका भव्य झाल्या, पण स्थानिक कलाकारांना वाव मिळेनासा झाला. आता इव्हेंट कंपन्या, बाऊन्सर्स आणि हाय-प्रोफाइल स्पॉन्सर्स यांचाच जलवा!
आजचा गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्ती नव्हे, तर एक प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट शो! 🎆
भक्तीच्या रंगात आता कॉर्पोरेटचा ग्लॅमर मिसळलाय… आणि जुन्या लोकसहभागी उत्सवाचा आत्मा हरवतोय!
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे