गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यातील विमाननगरमध्ये ४७ कोटींच्या बनावट नोटा जप्त

पुण्यातील विमाननगरमध्ये ४७ कोटींच्या बनावट नोटा जप्त

पुणे, दि.११जून २०२० : पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विमाननगर परिसरात असणाऱ्या संजय पार्क सोसिटीमधल्या एका घरातून ४३ कोटी रुपयांपेक्षा अधिक व भारतीय चलनातील चार कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात भारतीय चलनातील जप्त केलेल्या नोटांमध्ये दोन हजार, पाचशे, रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

शेख अलिम समाद गुलाब खान (वय ३६, रा. प्रतिकनगर, येरवडा), सुनिल सारडा (वय ४०), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय ४३), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय ३४) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.२८) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शेख अलिम खान हा बॉम्बे सॅपर्स डेपो बटालियन खडकी येथे नाईक या पदावर कार्यरत आहे. याबाबत उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version