गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे तहसीलदारास धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

तहसीलदारास धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड, २ सप्टेंबर २०२३ : उच्च न्यायालय तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घराचा ताबा घेत असलेल्या तहसीलदारास एका दाम्पत्याने धक्काबुक्की केली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रविण किसन ढमाले वय ४७, यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॠषीकेश रविकुमार राक्षे आणि त्यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे मुंबई उच्च न्यायालयाकडील रिट पिटीशन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, सांगवी परिसरातील मयूरेश साई निसर्ग पार्क सोसायटीतील घराचा ताबा घेत होते. त्या वेळी आरोपी यांनी फिर्यादी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली, तसेच शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version