गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी चिंचवड शहरातील कोविड १९ ची चाचणी आता होणार बस मधून

पिंपरी चिंचवड शहरातील कोविड १९ ची चाचणी आता होणार बस मधून

पुणे, दि.२० मे २०२०: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक प्रयोग शाळा विकसित करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ महापालिकेच्या आवारात महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (बुधवारी) करण्यात आला. त्यामुळे कोविड १९ ची चाचणी या बसमधील प्रयोगशाळेतून करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली अत्याधुनिक प्रयोगशाळा असून ती शहरातील वस्ती पातळीवर जाऊन काम करणार आहे.

याद्वारे पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे दुर्धर आजाराने त्रस्त व जेष्ठ नागरिकांची कोवीड पूर्व चाचणी या प्रयोगशाळेत विनामूल्य करण्यात येणार असल्याची माहिती ढोरे यांनी दिली आहे.

यावेळी शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर,  स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसदस्या भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, क्रिस्ना डायग्नोस्टीकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी अधिकारी अनिल साळुंके, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version