गोल पोस्ट महाराष्ट्र चाकूर येथे गोवंशाची कत्तल, १० जणांवर कारवाई

चाकूर येथे गोवंशाची कत्तल, १० जणांवर कारवाई

अहमदपूर, लातूर ३ जून २०२४ : चाकुर येथे उघड्यावर गोवंशाची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेंड्डी यांच्या पथकाने धाड टाकून, १० जनावर ताब्यात घेत कार्यवाही केली आहे. यावेळी २ लाख ४७, ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पाटील नगर भागात उघड्यावर गोवंशाची हत्या होत असल्याची धक्कादायक माहिती मिळताच. या ठिकाणी धाड टाकल्यानंतर सदरील ठिकाणी गोवंशाची हत्या करीत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये अंदाजे ६ क्विंटल कत्तल केलेले गोवंश मास आणि ४ जिवंत गोवंश असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्याठिकाणी चारा पाण्याची सोय न करता अतिशय क्रूरतेने बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

आरोपी अजमल कुरेशी आणि इतर अशा १० जणांना रा. लेंडी गल्ली चाकुर यांना ताब्यात घेऊन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, आरदवाड, रायबोळे, मरपल्ले यांनी ही कारवाई केली आहे, पुढील तपास चाकुर पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : राजमोहम्मद

error: Content is protected !!
Exit mobile version