गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट क्रिकेटच्या मैदानावरील ” तो” व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटच्या मैदानावरील ” तो” व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा गंभीर आणि मजेशीर घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर हसून हसून पोट धरायला लावणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तान सुपर लीगच्या पाचवा हंगाम सुरु आहे.
पीएसएलमध्ये लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यात रविवारी रात्री सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात झेल घेण्यासाठी फलंदाजाचे पाय धरलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लाहोर कलंदरचा फलंदाज बेनला बाद करण्याच्या प्रयत्नात कराची किंग्जचा यष्टीरक्षक चाडविक वॉल्टनने फलंदाजाचे पायच धरले.
लाहोर कलंदरच्या डावाच्या १० व्या षटकात हा प्रकार घडला. कॅमरन डेलपोर्टच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न बेनने केला. चेंडू बॅटला लागला, तेव्हा यष्टीरक्षक वॉल्टनने झेल घेण्यासाठी अतिउत्साहात तत्परता दाखवली. त्याला वाटलं की फलंदाजाला पकडल्याशिवाय झेल घेता येणार नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version