गोल पोस्ट गुन्हा माझ्या कुटुंबाला असलेल्या धोक्यातूनच गुन्हा दाखल: युवराज ढमाले

माझ्या कुटुंबाला असलेल्या धोक्यातूनच गुन्हा दाखल: युवराज ढमाले

पुणे, ४ ऑगस्ट २०२०: संजय काकडे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याला ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. मला प्रत्यक्ष धमकी दिल्यानेच मला माझ्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी वाटू लागली. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो.

त्यामुळेच माझे मेव्हणे संजय काकडे आणि बहीण उषा काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. अशी माहिती बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हा गुन्हा दाखल करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे ढमाले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पोलिसांवरही कुठल्याही प्रकारचा दबाव नसल्याचे ढमाले यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी केली तर सत्य नक्की बाहेर येईल, असेही ढमाले यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version