गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे डिजिटल गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकला तरुण, कोट्यवधींची फसवणूक!

डिजिटल गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकला तरुण, कोट्यवधींची फसवणूक!

जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडून एका तरुणाची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिटकॉइन आणि डिजिटल गोल्ड मायनिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे खोटे आश्वासन देऊन भोसरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला तब्बल १.११ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ईशा अगरवाल, अक्षया साक्षी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीवर सात कोटी रुपयांचा नफा मिळेल, असे आमिष दाखवून आरोपींनी तरुणाला बनावट लिंकद्वारे पैसे गुंतवण्यास भाग पाडले. जेव्हा तरुणाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी २० टक्के चार्जेसची मागणी करत पैसे देण्यास नकार दिला. यामुळे ऑनलाइन गुंतवणुकीचे धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version