गोल पोस्ट क्रीडा उबेर करंडक स्पर्धेतून माघारीचा निर्णय वैयक्‍तिक – पी. व्ही. सिंधू

उबेर करंडक स्पर्धेतून माघारीचा निर्णय वैयक्‍तिक – पी. व्ही. सिंधू

हैदराबाद, ५ सप्टेंबर २०२० : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने थॉमस व उबेर करंडक स्पर्धेतून माघार घेतल्याने तिच्यावर टीका सुरू झाली होती.

मात्र, आपण हा निर्णय कोरोनाच्या भीतीमुळे नव्हे तर वैयक्‍तिक कारणाने घेतल्याचे मत तिने व्यक्‍त केले आहे.

ऑक्‍टोबर महिन्यात थॉमस व उबेर करंडक या जागतिक स्तरावरील मानाच्या स्पर्धा सुरू होणार आहेत.

दरवर्षी या स्पर्धा खेळण्यासाठी जागतिक स्तरावरील खेळाडू तयारी करत असतात. असे असतानाही सिंधूने माघार घेतल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version