गोल पोस्ट महाराष्ट्र प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी : ॲड. छत्रपती शर्मा

प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी : ॲड. छत्रपती शर्मा

नागपूर, २४ मार्च २०२४ : वकिलांच्या सुरक्षिततेसाठी असा कोणताही कायदा सरकारने तयार केला नाही. वकीलांवर होणाऱ्या हल्ल्यावर अंकुश घालण्यासाठी ऍक्ट प्रोटेक्शनची नितांत आवश्यकता आहे, असे अँड. छत्रपती शर्मा यांनी काल नागपूर येथील पत्रकार परिषदेत सांगीतले.

यातील ॲक्टमध्ये वकिलांना राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत सुरक्षा मिळावी हेच अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या २९ मार्च २०२४ रोजी आमदार निवास सिविल लाईन नागपूर येथे विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

यावेळी विविध राज्यातून पदाधिकारी, बार कौन्सिल हायकोर्ट, डिस्ट्रिक कोर्ट आणि फॅमिली कोर्टचे अध्यक्ष व सचिव उपस्थित राहतील, असे छत्रपती शर्मा यांनी सांगितले आहे.

यावेळी ॲड. चंद्रशेखर ठाक, मृणाल मोरे, कोकिळा लवात्रे, गुणरत्न रामटेके, दीक्षा जेठानी, ए.पी.सिंह, सुनीता शिवहरे, दिलीप रामटेके, कांचन वराडे, विशाखा मेश्राम युवराज्ञनी रामटेके आणि विलास राऊत, प्रदीप जयस्वाल उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

error: Content is protected !!
Exit mobile version