गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक मुस्लिम बांधवांची ‘जुमे’ नमाज अदा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुस्लिम बांधवांची ‘जुमे’ नमाज अदा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोणी काळभोर, दि. २९ ऑगस्ट २०२०: पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज जुमे नमाज अदा करण्याची परवानगी मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे जिल्हा पालकमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे मुस्लिम बांधवांच्या वतीने दर शुक्रवारी जुमे नमाज अदा करण्यासाठी पुणे जिल्हा सरचिटणीस राहिल शेख यांनी मागणी केली आहे.

सर्व समाजातील नागरिकांनी मोलाचा वाटा उचलून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यामुळेच आज आपल्या भारत देशामध्ये विविध जाती धर्मातील नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. तसेच आजच्या कोरोनाच्या काळात भारतातील सर्व जाती धर्मातील नागरिक या संकटापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारे लढा देत आहेत.

मुस्लिम बांधवांच्या भावना समजून घेऊन फक्त दर शुक्रवारी ‘जुमे नमाज’ अदा करण्याची परवानगी द्यावी व नमाज अदा करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व शासनाच्या इतर सर्व अटी नियमाचे पालन करून नमाज अदा करू असे पुणे जिल्हा सरचिटणीस रहील शेख यांनी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version