गोल पोस्ट महाराष्ट्र उपमुख्यमंञी नामदार अजितदादा पवार यांनी छञपती संभाजीनगर येथे घेतली आढावा बैठक

उपमुख्यमंञी नामदार अजितदादा पवार यांनी छञपती संभाजीनगर येथे घेतली आढावा बैठक

छत्रपती संभाजीनगर, २३ फेब्रुवारी २०२४ : मा. ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विषयांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध विकासकामांची प्रगतीचा आढावा ना. अजितदादा पवार यांनी घेतला आणि संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी मंत्री मा.अतुल सावे, मंञी मा.संदिपान भुमरे, मा .सतीश चव्हाण, मा.रमेश बोरणारे, विभागीय आयुक्त मा. मधुकरराजे आर्दड, जिल्हा अधिकारी, मा.दिलीप स्वामी, मनपा आयुक्त मा. जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मा. मनोज लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. विकास मीना, मा. पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानिया, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : डॉ. सचिन साबळे

error: Content is protected !!
Exit mobile version