गोल पोस्ट महाराष्ट्र जालना ते त्र्यंबकेश्‍वर वारीसाठी भाविकांना मिळणार मोफत व्यवस्था…

जालना ते त्र्यंबकेश्‍वर वारीसाठी भाविकांना मिळणार मोफत व्यवस्था…

जालना, २५ जानेवारी २०२४ : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त जालना ते त्र्यंबकेश्‍वर वारी ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. जालना येथून ५ फेब्रुवारी रोजी भाविकांचा जत्था गोपी किशन नगर येथील ज्ञानेश्‍वर माऊली मंदिर येथून निघणार आहे. तरी भक्तांनी १ फेब्रुवारीपर्यंत वारीसाठी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन किर्तनकार योगीराज महाराज लोखंडे यांनी केले आहे. या वारीसाठी जाण्या-येण्याची तसेच भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून, भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने त्र्यंबकेश्‍वर वारीसाठी आपली नाव नोंदणी गोपी किशन नगर येथील ज्ञानेश्‍वर माऊली मंदिर, जालना येथे करावी असे आवाहनही योगीराज महाराज लोखंडे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

error: Content is protected !!
Exit mobile version