गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट धोनीला का नाही विचारत, गांगुलीचे बुचकळ्यात टाकणारे उत्तर

धोनीला का नाही विचारत, गांगुलीचे बुचकळ्यात टाकणारे उत्तर

दिल्ली: २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्यानंतर धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं होतं. धोनीचं वाढतं वय लक्षात घेता संघात तो पुनरागमन करण्याची शक्यता धूसर होत आहे. धोनीने आणखी काही काळ खेळावं, असं वाटणारा एक चाहतागट आहे, तर दुसऱ्या गटाला मात्र धोनीने रिटायरमेंट घ्यावी, असं वाटतं. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला.
बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीला याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने प्रश्नाचा चेंडू धोनीकडेच टोलवला. धोनीलाच का नाही विचारत’ असं उत्तर खुद्द गांगुलीने दिल्यामुळे सारेच अवाक झाले.

error: Content is protected !!
Exit mobile version