गोल पोस्ट महाराष्ट्र खडकवासला सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढला

खडकवासला सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढला

पुणे २ ऑगस्ट २०२४ : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १३९८१ क्युसेक्स विसर्ग वाढवून आज दुपारी २ वाजता १६२४७ क्यूसेक्स करण्यात आलाय. त्यात आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता मुठा कालवा पाठबंधारे उपविभाग पुणे यांनी केलंय.

पावसाच्या प्रमाणानुसार तसेच ओढ्या नाल्यातील पाण्याच्या येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, अशी
माहिती सुद्धा यावेळी मुठा कालवा पाठबंधारे उपविभाकडून देण्यात आलीय.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

error: Content is protected !!
Exit mobile version