गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस

मुंबई, दि.१९मे २०२० : नवाजुद्दीन सिद्धकीला मोठा धक्का सध्याचा आघाडीचा बॉलिवूडमधील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवाजच्या पत्नीने म्हणजेच आलियाने सिद्दीकी हिने त्याच्यापासून घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. शिवाय तिच्याकडून नवाजला रितसर नोटीसही पाठवण्यात आली आहे. एवढेच नाही आलियाकडून त्याच्याकडे पोटगीचीही मागणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

यावेळी आलियाने म्हटले आहे की, आपल्या वैवाहिक आयुष्यात तणाव असून तो गंभीर स्वरुपाचा तणाव आहे, असे म्हणत पुढे अशाच परिस्थितीत हे नातं टिकवणे कठीण असल्याची माहिती तिने दिली. तणावाचे मुळ कारण सांगण्यास मात्र तिने नकार दिला असल्याचे पहायला मिळाले.

नवाज आणि त्याची पत्नी यांचं जवळपास १० वर्षांचं वैवाहित जीवन धोक्यात आल आहे. ही बाब अनेकांनाच धक्का देणारी ठरत आहे. मागील काही वर्षांपासून नवाज आणि त्याच्या भावामुळे आपल्या वैवाहिक नात्यात तणावाची परिस्थिती उदभवल्याचा सूर तिने आळवला होता.

काही काळ आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केल्यानंतर अखेर तिने घटस्फोटासाठीचे पाऊल उचलल आहे. नवाजला आठवडाभरापूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवण्यात आली. याबाबत उत्तर मिळण्याची वाट आता आलियाला पहावी लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version