गोल पोस्ट इतर राजकारण शेंबड्या शिवसैनिकात राष्ट्रवादी काँग्रेसवर केस ठोकायची हिम्मत आहे का?

शेंबड्या शिवसैनिकात राष्ट्रवादी काँग्रेसवर केस ठोकायची हिम्मत आहे का?

मुंबई, दि. १८ जुलै २०२०: समीत ठक्कर या युवकाने उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्या काळातील औरंगजेब असा केला होता. तर आदित्य ठाकरे यांना मोहम्मद अझम शाह उर्फ बेबी पेंग्विन म्हटले होते. समीत ठक्कर यांने केलेल्या ट्विट नंतर गुरुवारी #बेबी पेंग्विन हा हॅशटॅग ट्विटर’वर ट्रेंड करत होता. यानंतर समीत ठक्कर याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे. आदित्य ठाकरे आता राष्ट्रवादी काँग्रेस वर गुन्हा दाखल करतील का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जुन्या ट्विटचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, “आता शिवसेना-राष्ट्रवादी वर गुन्हा दाखल करेल का ?”

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version