गोल पोस्ट कट्टा संस्कृती भीमथडी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.जयप्रकाश घुमटकर, स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब फडके तर निमंत्रकपदी वसंतराव साळुंखे

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.जयप्रकाश घुमटकर, स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब फडके तर निमंत्रकपदी वसंतराव साळुंखे

पुणे,२४ मे २०२३ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या दुसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर यांची निवड करण्यात आली आहे.स्वागताध्यक्ष पदी भाऊसाहेब फडके यांची तर निमंत्रक पदी वसंतराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

दूसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि २७ व २८ मे २०२३ रोजी होणार आहे.संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव,राजाभाऊ जगताप,डॉ.भालचंद्र सुपेकर,संमेलनाचे मुख्य संयोजक संजय सोनवणे,दीपक पवार,रवींद्र खोरकर,सुशांत जगताप, बाळासाहेब मुळीक,अरविंद जगताप,रामभाऊ नातू उपस्थित होते. 

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,जलाभिषेक,उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण,कथाकथन, नाट्यप्रयोग,परिसंवाद,कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version